Saturday, September 27, 2008

मी बरसलो आज शब्दांतुन......

मी बरसलो आज शब्दांतुन , तीला एकही शब्द ना कळला कधीमी ओघळलो आज डोळ्यांतुन , तीचा थेबंही ना गळला कधी.
सोडुन मान सन्मान माझा मीच दगडापुढे हात जोडीलेमी कोसळलो दरड होऊन , तीचा एकही बुरुज ना ढळला कधी.
तीची एकही बोली नाही आज लिलावात या माझ्यामी बसलो बाजार मांडून , तीने भाव माझा ना विचारला कधी.
आयुष्यभर तीच्या कुपंणाबाहेर जागा माझी नित्याचीमी राहीलो कुंपण बनुन , तीने हा निवडूंग अंगणात ना लावला कधी.
सा-याच राती तीच्या चादंण्याच्यां मिठीत गेल्यामी जगलो काजवा होऊन , तीला उजेड माझा ना दिसला कधी.
आठवतय रोज जाळं तीच पसरवण तळ्यात चद्रंबिबांसाठीमी राहीलो शिपलं बनुन , माझ्यातला मोती तीने ना शोधला कधी.
मी होतो पाखरु जळणारा ती ज्योत होती मला जाळणारीमी जळालो पाखरु बनुन , तिला एकही चटका ना लागला कधी.
मी लाचार इतका की आज माझीच कीव मज यावीमी मला दिले आगीत झोकून , तीचा धुराकडेही जिव ना वळला कधी.
आता मज नकोच तिच्या प्रेमाच्या उसण्या त्या थापामी चाललो स्वप्न मोडुन, तीने स्वप्नांतही मला ना सोडला कधी

Saturday, September 20, 2008

दिस नकळत जाई

दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही
क्षण एक ही ना ज्याला, तुझी आठवण नाही
भेट तुझी ती पहिली, लाख लाख आठवतो
रुप तुझे ते धुक्याचे, कण कण साठवतो
वेड सखी साजणी हे, मज वेडावून जाई
असा भरुन ये ऊर, जसा वळीव भरावा
अशी हूरहूर जसा गंध रानी पसरावा
रान मनातले माझ्या, मग भिजूनीया जाई
आता अबोध मनाची, अनाकलनीय भाषा
कशा गूढ गूढ माझ्या तळहातावर रेषा
असे आभाळ आभाळ दूर पसरुन राही
--अरुण दाते

पुन्हा ढग दाटून येतात

पुन्हा ढग दाटून येतात, पुन्हा आठवणी जाग्या होतात
तिचे माझे सारेच पावसाळे, माझ्या मनात भिजून जातात
पुन्हा पाऊस ओला ओला, पुन्हा पाऊस बांधून झूला
तिच्याकडले उरले झोके, परत करतो माझे मला
पुन्हा पाऊस खूप ऐकतो, पुन्हा पाऊस खूप बोलतो
त्याच्या माझ्या गप्पांमधले तिचे थेंब अलगद झेलतो
पुन्हा पावसाला सांगतो मी, पुन्हा पावसाशी बोलतो मी
माझे तिचे आठवण थेंब, पुन्हा पावसालाच मागतो मी
--सौमित्र

पाऊस पडून गेल्यावर......

पाऊस पडून गेल्यावर, मन पागोळ्यांगत झाले
क्षितीजाच्या वाटेवरती पाण्यावर रांगत गेले
थेंबांना सावरलेल्या त्या गवतांच्या काडांचा
पाऊस पडून गेल्यावर, मी भिजलेल्या झाडांचा
पाऊस पडून गेल्यावर, मन थेंबांचे गारांचे
आईस चकवूनी आल्या त्या डबक्यांतील पोरांचे
मोडून मनाची दारे, येवुली पाऊल भरती
पाऊस पडून गेल्यावर, या ओल्या रस्त्यावरती
पाऊस पडून गेल्यावर, मी चंद्रचिंब भिजलेला
विझवून चांदण्या सार्‍या, विझलेला शांत निजलेला
पाऊस पडून गेल्यावर, मन भिरभीरता पारवा
पाऊस पडून गेल्यावर, मन गारठता गारवा............
--सौमित्र