Sunday, June 2, 2013

नातं कस असत्...गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप , मध्येच माघार घेऊ नकोस...!

-  एक अनामिक

Saturday, May 25, 2013

हि एक मिठी तुझ्यासाठी...जग खूप मोठंय ना ? असं कधी कधी वाटतं
पण एखाद्या प्रेमळ मिठीत,पूर्ण जग भेटतं
त्या क्षणात मग हवी हवीशी,उब भरून राहते
समोरच्याच्या बाहुतून तुमच्यामध्ये वाहते
म्हणून हि एक मिठी तुझ्यासाठी..

दोराने बांधून कुणाला मिळवता येणार नाही
किंवा तोडलेलं मन,असं जोडताही येणार नाही
शेवटी एकच उपाय, जो कधीच फसणार नाही
एक मिठी आणि गोड स्मित, दुसरे काही नाही
म्हणून हि एक मिठी तुझ्यासाठी.....

कधी हलकेच तर कधी कडाडून मारलेली मिठी
कधी निरोपासाठी , तर कधी स्वागतासाठी
जर जाणवलं देवाने हात दिलेत ह्याच गोष्टीसाठी
तर देत राहा जादू कि झप्पी, आयुष्याभरासाठी
म्हणून हि एक मिठी तुझ्यासाठी...

-  एक अनामिक

Wednesday, January 25, 2012

म्हणुन आजही मी तीच्यासाठी गप्प आहे...

ती मी दिलेल्या सर्व आठवणी,
पुसण्याचा प्रयत्न करतेय..
माझ्या पासुन खुप लांब,
जाण्याचा प्रयत्न करतेय..
पण मला माहीत आहे,
ती मला मनातुन काढुचं शकत नाही..
कितीही प्रयत्न केले तरी,
ती मला कधीचं विसरु शकत नाही..
मला माहीत आहे,
मी तीच्या डोळ्यात फक्त आश्रुंच दिलेय..
तीला आश्रुं देताना,
मी पण खुप रडलोय..
तीला मात्र हे कधीचं,
मी समजुचं दिले नाही..
तीच्यावर माझे खुप प्रेम आहे,
हे मी कधीचं जानवू दिले नाही..
कारण मी असा मुद्दाम वागत होतो,
तीला त्रास होऊ नये म्हणुन काळजी घेत होतो..
कारण मला माहीत आहे,
ती माझ्याशिवाय कधीचं राहू शकत नाही..
पण माझ्यामुळे तीला झालेला त्रास,
मी कधीचं पाहू शकत नाही..
म्हणुन आजही मी तीच्यासाठी गप्प आहे.


- एक अनामीक

Tuesday, October 11, 2011

मी रोज तिच्या प्रेमात पडतो

 मी रोज तिच्या प्रेमात पडतो.. 
कधी तिच्या हृदयावरच्या तिळेवर 
तर कधी गालांवरच्या लालीवर.. 
कधी काजळलेल्या डोळ्यांवर 
तर कधी गुलाबी ओठांवर.. 
तिच्या चालणं कमी धावण्यावर 
तर कधी नक्षीदार वळणांवर . ...
प्रेमात पडायला कधी कारणं लागतात...?? 
मी रोजरोज तिच्या आणि तिच्याच प्रेमात पडतो..                                  

Tuesday, May 24, 2011

आठवण आली तुझी की...

आठवण आली तुझी की,
नकळत डोळ्यांत पाणी येतं..
मग आठवतात ते दिवस
जिथं आपली ओळख झाली..

आठवण आली तुझी की,
माझं मन कासाविस होतं
मग त्याच आठवणीना..
मनात घोळवावं लागतं..

आठवण आली तुझी की,
वाटतं एकदाच तुला पाहावं
अन माझ्या ह्रदयात सामावुन घ्यावं..
पण सलतं मनात ते दुःख..
जाणवतं आहे ते अशक्य...
कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य...
पण तरिही.........

आठवण आली तुझी की,
देवालाच मागतो मी....
नाही जमलं जे या जन्मी
मिळू देत ते पुढच्या जन्मी....
-- एक अनामीक

Wednesday, May 4, 2011

विश्वास ठेवा यात काही पाप नाही...

सिगरेटचा जेव्हा तुम्ही, मजेत घेता मस्त झुरका,
आवडलेल्या आमटीचा, आवाज करीत मारता भुरका,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !
जबरदस्त डुलकी येते, धर्मग्रंथ वाचता वाचता,
लहान बाळासारखे तुम्ही, खुर्चीतच पेंगू लागता,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !
देवळापुढील रांग टाळून, तुम्ही वेगळी वाट धरता,
गरम कांदाभजी खाऊन, पोटोबाची पूजा करता,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !
प्रेमाची हाक येते, तुम्ही धुंद साद देता,
कवितेच्या ओळी ऐकून, मनापासून दाद देता,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !
–मंगेश पाडगावकर